(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) सैय्यद नदीम अली, कोरपना
कोरपना:- स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना तर्फे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर प्रतिवर्षी आयोजित करण्यात येते. पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात मैदानी सरावाला बंदी घातली होती. तसेच प्रशासनाने तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. आता राज्य सरकार कडून मैदानी सरावासाठी मैदानी उघडे करण्यात आली आहे. परंतु कोरपना तालुका क्रीडांगण हे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण सराव करण्यासाठी प्रशासनातर्फे बंद ठेवण्यात येत आहे. याउलट जिल्ह्यातील तथा लगतच्या जिल्ह्यातील मैदानी वैयक्तिक सरावासाठी खुली करून देण्यात आली आहे. अशा वेळी राज्य शासनाकडून आलेल्या आदेशान्वये कोरपना तालुका क्रीडांगण मैदानी सरावासाठी खुली करून देण्यात यावी.
यासाठी स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना तर्फे माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. तसेच सराव करणाऱ्या विद्यार्थी कडून मैदानाची मागणी वारंवार करण्यात येत आहे. आणि विद्यार्थ्यांच्या भावी करियर च्या दृष्टीने आगामी पोलिस भरती महत्वपूर्ण असल्याने मैदान खुले करण्याचा विषय विद्यार्थी हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्याने ग्रुपच्या वतीने तहसीलदार साहेबाना निवेदनाद्वारे सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी संदर्भाने अवगत करून देण्यात आले. व वरील मुद्या चे तात्काळ समाधान करावे अशी विनंती करण्यात आली.