आदर्श शाळेत स्कॉऊट-गाईड च्या वतीने सर्वधर्मसमभाव प्राथणेचे आयोजन.

Bhairav Diwase
माजी राष्ट्रपति स्व. प्रणव मुखर्जी व कोरोना योध्याना  वाहली श्रध्दांजली.
Bhairav Diwase.    Sep 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ ,राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्कॉऊट यूनिट व राष्ट्रमाता जिजाऊ गाईड यूनिट च्या वतीने माजी राष्ट्रपति स्व. प्रणव मुखर्जी व कोरोणा योध्दे यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्वधर्मसमभाव प्राथणेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य भारत स्कॉऊट आणि गाईड कार्यालय चंद्रपुर च्या सूचना व मार्गदर्शना नुसार सदर सर्वधर्मसमभाव प्राथणेचे आयोजन करण्यात आले. 
यावेळी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे ,आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर ,छ. शिवाजी महाराज स्कॉऊट यूनिट लिडर बादल बेले, रुपेश चिडे , राष्ट्रमाता जिजाऊ यूनिट लिडर वैशाली चीमुरकर ,कब -बुलबुल यूनिट लिडर सुनीता कोरडे ,अर्चणा मारोटकर ,वैशाली टिपले ,रोशनी कांबले ,ज्योती कल्लूरवार, आदीसह शिक्षक -शिक्षिका उपस्थित होते. यावेळी लॉर्ड बेडेन पॉवेल ,लेडी बेडेन पॉवेल व स्व. प्रणव मुखर्जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.  सरस्वती वंदना ,गुरूवंदना ,रामधून ,नामधुन ,सर्वधर्म प्राथणा , एक मिनिट मौन , शांतीपाठ आदी घेण्यात आले. देशात सुरू असलेल्या कोरोणा जागतिक महामारीच्या संकटाचा सामना करतांना अनेक कोरोणा योद्धानी आपल्या प्राणाची आहुति दिली. तसेच भारत देशाचे माजी राष्ट्रपति स्वर्गीय प्रणव मुखर्जी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सावि येसेकर ,हरीता फटाले ,रितु दुपारे , सुप्रिया रागिट, दिव्या बावणे  ,वेदांत इंगडे ,रेहान शेख ,  सानिया मूद्देवार आदींचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाची सांगता व्रूक्षारोपन करून झाली.