नगरपंचायत चे माजी सभापती श्री राकेश पून यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत नगरपंचायत तर्फे नवीन ठराव पारित.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
बल्लारपूर:- नगरपंचायत चे माजी सभापती श्री राकेश पून यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत नगरपंचायत तर्फे नवीन ठराव पारित माजी बांधकाम सभापती तथा नगरसेवक गोंडपिपरी श्री. राकेश पुन यांच्या मागणीनुसार शहरातील मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकल्यानंतर कोंडवाडा शुल्क कमी असल्यामुळे जनावरांच्या मालकांनी हे नगरपंचायत चे नेहमीचेच कारण असल्याने ते जनावरे सोडवून तसेच मोकाट सोडतात त्याकरिता नगरपंचायत च्या माध्यमातून श्री राकेश पून यांनी हा विषय मासिक सभेत ठेवून यावर चर्चा करून अंमलबजावणी करण्याकरिता प्रश्न उपस्थित करून नगरपंचायत च्या सभेत नव्याने ठराव पारित करण्यात आला
तो याप्रमाणे तीन दिवसांपर्यंत एक हजार रुपये शुल्क दंड असेल नंतर प्रत्येक दिवसाचे शंभर रुपये प्रमाणे वाढ व जनावरांना दहा दिवसाच्या आत सुटका न केली असता अकराव्या दिवसानंतर जनावरांचा लिलाव करता येणार याकरिता ठराव पारित करण्यात आला आहे.
तरी नागरिकांनी आपली जनावरे मोकाट न सोडता आपल्याच घरी बांधून ठेवावी असे नगरपंचायत च्या माध्यमातून कळविण्यात येत आहे.