कोरोना बाधितांची खाजगी रुग्णालयात होतेय का लुट?
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपुरातील खाजगी डॉक्टरांच्या सूचना फलकाने कोरोना बाधिता मधे धड़की भरली असल्याचे कळले असुन दीड लाख रुपये अगोदर जमा केल्यानंतर रुग्णाला दाखल करू अशी भुमिका खाजगी डॉक्टर घेत असल्याचे बोलल्या जात आहे.
चंद्रपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या खाजगी रुग्णालयात ही कोरोना बाधिताना जागा मिळत नसल्याने गोंधळ उडाला आहे. कोरोना बाधित सोम्य आजार किंवा त्याहुन जास्त गंभीर आजार असणाऱ्या रुग्णालाच उपचारार्थ दाखल करून घेऊ.
रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास किंवा ऑक्सिजनची गरज भासल्यास शासकीय रुग्णालयात उपचारार्थ घेऊन जाणे बंधनकारक राहील. रुग्ण भरती करताना दहा दिवसाचे पैसे अगोदर जमावे करावे लागेल. अशी नियमावलीच शहरातील खाजगी डॉक्टरांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्रारावर लावण्यात आल्याने कोरोना बाधित रुग्ण तथा नातेवाईकांच्या उरात धडकी भरली आहे.
वैद्यकीय सेवा ही सामाजिक सेवा आहे असे म्हटले जाते . मात्र चंद्रपुरातील डॉक्टरांची ही कृती बघून सर्वांना धक्का बसला आहे. अतिदक्षता कक्ष तथा ऑक्सीजन व्हेंटिलेटर साठी नऊ हजार रुपये व दीड लाख रुपये जमा करावे लागेल . त्यासोबतच रोज औषधे व तपासणीच्या खर्च वेगळा करावा लागेल . अतिदक्षता विभागात रोज PPE किट औषधे व तपासणीच्या खर्च रोज स्वतंत्रपणे द्यावे लागेल . कोरोणा बाधिता ला निमोनिया असल्यास रुग्णाला ऑक्सीजन व्हेंटिलेटर घ्यावे लागेल. या सर्व सूचना रुग्णाच्या नातेवाईकांना मान्य असल्यास रुग्णाला दाखल करून घेण्यास आम्ही तयार आहोत असे खाजगी डॉक्टर चे म्हणणे आहे. दरम्यान खासगी डॉक्टरांच्या अशा प्रकारामुळे कोरोणाबाधितामधे असंतोषचे वातावरण आहे. दरम्यान जिल्ह्य प्रशासन या बाबतीत कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.