बिबट्याच्या बछड्याचा
मृत्यू कशाने झाला याच गूढ कायम?
मृत्यू कशाने झाला याच गूढ कायम?
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी उपवनक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या अंतरगाव टोला येथे नवभारत शाळेच्या मागील बाजू च्या नहराजवळ बिबट्याच्या बछडा हा दुपारी २ च्या सुमारास जखमी अवस्थेत पडलेला होता. किमान एक तासापासून बछडा हा जखमी अवस्थेत असल्याचे माहिती गावकऱ्यांना झाली त्यावेळी मोठ्या प्रमाणात अंतरगांव वासियांची पाहन्यास गर्दी झाली त्याच्या पाठीला जखम असल्याचे निर्दर्शनास आले. या प्रकरणाची माहिती वनविभाग ला कळविण्यात आली मात्र टीम पोहण्या अगोदरच अर्ध्या तासातच बिबट्याने आपले प्राण सोडले आहे. मृतक बिबट्याच्या बछड्याचा वनविभाग कडून पंचनामा सुरू करण्यात आला. त्यामुळे बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू कशाने झाला याची माहिती वनकर्मचारी घेत आहेत.