किराणा दुकानात काम करत असतांना, घरी जाण्यास झाला ऊशिर.

Bhairav Diwase
मालकाच्या विनवणी वरुन मालकाच्या घरी गेली; तिथेच तिचा घात झाला.
Bhairav Diwase. Oct 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- पोलीस स्टेशन हद्दितील गणेश ट्रेडिंग कंपनी रय्यतवारी परिसरातील किराणा दुकानात कामावर असलेल्या 23 वर्षीय मुलीवर तिचे गुप्त रित्या काढलेले अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केला. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारुन टाकण्याची धमकी दिल्याची घटना ऊघडकिस आली आहे.                       

             सविस्तर वृत्त याप्रमाणे पिडीत मुलगी हि चंद्रपुर मधिल स्थानीक रहिवाशी असुन ति आपल्या आई-वडिलांसोबत राहते. घरची परिस्थिती अत्यंत हालाकिची असल्याने आत्मनिर्भर होऊन कुटूंबाला हातभार लागेल या ऊद्देशाने रयतवारी परिसरातील गणेश ट्रेडिंग कंपनी नावाच्या किराणा दुकानात ०५ जुलै पासून कामाला जायची. त्या किराणा दुकाणाचे मालक नामे (धृवप्रसाद गुप्ता) यांचा मुलगा नामे ऊत्तम गुप्ता वय 24 वर्ष यांनी पिडीत मुलीवर वाईट दृष्टी होती. संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्याने तिला लग्नाचे आमिष देखील दाखविले होते.                        
      २१ ऑगस्टला दुकाण बंद करुन घरी जाण्यास ऊशिर झाला. रात्रौ चे बारा वाजुन गेल्याने दुकानाचे मालक धृवप्रसाद गुप्ता यांनी आपुलकी दाखवीत तिला आपल्या घरी सोबत चालण्यास सांगितले. तिने सुद्धा मालकाच्या शब्दाला माण देऊन मुक्कामास घरी गेली. जेवन करुन दिलेल्या रुम मध्ये झोपायला गेली. दिवस भराच्या थकव्याने तिला लवकरच गाढ झोप लागली. तिला गाढ झोपेत गेल्याचे पाहुन ऊत्तम गुप्ता याने चाहुल न लागता तिच्या रूममध्ये शिरला. तिचे अश्लिल फोटो काढले, अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण तिला जाग आली. प्रकरण कळताच तिने ओरडण्याचा प्रयत्न केला परंतु त्या निर्दयी नराधमाने तिचा तोंड दाबुन धरला. आरडा ओरडा केल्यास अश्लिल फोटो व्हायरल करेन, शिवाय तुझ्यावर चोरीचा आरोप देखील लावनार, शेवटी नाही मानल्यास जिवे मारुन टाकेण अशा धमक्याच्या बळावर ऊत्तम गुप्ता या नराधमाने संधीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. त्याच्या नर शक्ती पुढे ति कमी पडल्याने त्याचा अत्याचार निमुटपणे सहन केली.                      
             
          आपल्यावर झालेला अत्याचार तिला स्वस्थ बसु देत नव्हता अखेर काही दिवसांपूर्वी या प्रकरणामुळे त्रस्त झालेल्या मुलीने पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दिली. २९ सप्टेंबर तक्रारीवरुन रामनगर पोलीसांनी आरोपी ऊत्तम गुप्ता याला अटक करुन भां.द.सं.कलम 376 अन्वये गुन्हा नोंद केला. संबधित पिडीतेला न्याय मिळेल या दुर दृष्टीकोनातुन समोरील तपास किर्ती वाघधरे (PSI) करित आहेत.