(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- सणासुदीच्या काळात दारू विक्रीला उधाण येतं असते जिल्ह्यात दारूबंदी होऊन सहा वर्षाचा कालावधी लोटला असला तरी मोठ्या प्रमाणावर दारू विक्रीचा महापुर सुरू आहे, नुकताच सणासुदीच्या काळाला सुरुवात झाली असताना गडचांदुर पोलीसांनी ट्रक सह लक्षावधी रुपयांची दारू तस्करी करणाऱ्या विरूद्ध कारवाई केली यात ट्रक वाहन क्र एम एच४0,bg 6947 वाहनासह,वाहनात एकुण 257 पेटी देशी दारू ने भरलेल्या सुपर सानिक राकेट संत्रा कंपनी सिलबंद निपा कि.2570000, ट्रकवाहन क्र 6947 की. 15 लाख , असा एकूण 40 लाख 70 हजार रुपये किंमतीचा माल ताब्यात घेतला सदरच्या घडामोडीत वाहन चालक नामे राहुल अंबादास पहूनकर, हा भेटला तर दोन आरोपी फरार झाले.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा ,सहकलम १८८,65(A) ६५(E)अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाही एसडीपीओपो सुशील कुमार नाईक व गडचांडूर स्टेशन प्रमुख गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ,Api प्रमोद शिंदे,Psi युवराज पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी ही धडाकेबाज कामगिरी केली.
जिल्ह्यातील काही स्वयंभू नेते व त्यांचे सहकारी कोरपना तालुक्यातील गडचांदुर पोलिस स्टेशन विरूद्ध जनमानसात भलत्याच अफवा पसरवत होते ही कारवाही त्यांच्या गालावर चपराक बसावल्यासारखी आहे तसेच सणासुदीच्या काळात अवैध दारू विक्रेत्यां विरूद्ध पोलिसांनी कारवाई चा सपाटा सुरू केल्याने सणासुदीच्या काळात अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत .