Top News

अखेर आर्वी येथील कोंबडा बाजारावर पोलिसांची कारवाई.

माजी आमदार वामनराव चटप यांच्या धास्तीने केली कारवाई.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यात गेल्या एक वर्षापासून अनेक अवैध्य धंद्यांना उत आले आहे. राजुरा तालुक्यात आता सुद्धा भंगार तस्करी,कोळसा तस्करी, विशेष म्हणजे कोट्यवधी उलाढाल होत असलेला कोंबड बाजार राजुरा पोलिस स्टेशन पासून काही किलोमीटर वर सुरू होता. याची कल्पना राजुरा पोलिस स्टेशन ला खरच नसेल काय? असा प्रश्न अनेक नागरिकांच्या मनात आलेला होता. हा कोंबड बाजार एका बड्या नेत्याच्या व राजुरा पोलिस स्टेशन मधील डी.बी.पथकाच्या आशीर्वादाने चालत असल्याची राजुरा शहरात जोरदार चर्चा होती.

        राजुरा विधानसभेचे माजी आमदार वामनराव चटप यांनी कोंबड बाजार बंद करा अन्यथा आम्ही त्याचा सोक्ष मोक्ष लाऊ अशी तक्रार दिली होती त्याचीच एक धास्ती घेत पोलिसांनी कोंबड बाजार येथे धाड टाकत थातुर मातुर कारवाई केल्याची सूत्रांची माहिती आहे. कोंबडा बाजार येथे रोज हजारो लोकांची गर्दी जमायची आज तर रविवार असल्याने जोरदार गर्दी होती अशी प्रत्यक्षदर्शी यांची माहिती आहे. परंतु हा कोंबडा बाजार मोठा हप्ता देऊन चालवत असल्याने तेथील जुगार खेळणारे व कोंबडा बाजारातीलल नागरिकांना पोलिसांनी हाकलून लावल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे. तालुक्यात अनेक अवैध्य धंदे सुरू आहेत यावर पोलिस विभाग कारवाई केव्हा करतील याकडे जनतेच लक्ष लागलेले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने