Top News

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उलगुलान संघटना व बोद्ध विकास मंडळ तर्फे 3000 बुक व 200 कॅलेंडर वाटप.


Bhairav Diwase.   Jan 07, 2021
मुल:- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जेयंती निमित्त उलगुलान संघटना व बोद्ध विकास मंडळ  तर्फे 3000बुक व 200 कॅलेंडर वाटप करण्याचा उपक्रम राबविले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमनाथ (प्रकल्प) येथे बुक व कॅलेंडर वाटप करण्यात आले या वेळी उलगुलान संघटना शाखा, मूल चे अध्यक्ष निखिल भाऊ वाढई,  बोद्ध विकास मंडळ चे अध्यक्ष शमिकांत भाऊ डोर्लीकर, उपाध्यक्ष प्रणित पाल सचिव आकाश येसनकर, रोहित शेंडे, यांनी गरजू विद्यार्थ्यांना बुक वाटप करण्याचा उपक्रम राबविला.



     3 जानेवारी महिला  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने उलगुलान संघटना शाखा मुल व बोद्ध विकास  मंडळ द्वारा ३००० नोटबुक व 200 कॅलेंडर चे वितरण करण्यात आले.
     
      शिक्षणाचे आराध्य दैवत क्रांतीसुर्य महात्मा फुले तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांच्या शिक्षणाचे दार उघडले. असंख्य हाल-अपेष्टा सहन करून शिक्षणाचे महत्त्व  या दोन्ही दाम्पत्यांनी पटवून दिले. त्यांच्यामुळेच आज महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात गरूड झेप घेतली आहे. अशा या महान महामानवांच्या विचारांना प्रेरणा मिळावी तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना एक छोटीशी मदत म्हणून उलगुलान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व बोद्ध विकास मंडळ ने नोटबुक वितरणाचा उपक्रम मुल शहरात राबवला. व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमनाथ(प्रकल्प )येथे तसेच नवभारत विद्यालय मूल व देवनील चे विद्यार्थी विद्यार्थिनीला येता जाता नोट बुक चे वाटप करण्यात आले लोकांच्या घरी जाऊन गरजू विद्यार्थ्यांना बुक चे वाटप करण्याचा उपक्रम पुर्ण झाला आहे तरी उलगुलान संघटना शाखा मूल आणि बोद्ध विकास मंडळ मूल हे शैक्षणिक कामात गरजू मुलानं मुलींना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मदत वेळो वेळी करत राहणार शाखा अध्यक्ष निखिल वाढई व मुल मधील वॉर्ड नंबर 16 बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष शमिकांतभाऊ डोर्लीकर  यांच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक दायित्व याचे भान ठेवून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  यांच्या जयंतीनिमित्त मुल शहरात आदरांजली वाहिली.
                 
    नोटबुक चे वितरण करताना उलगुलान संघटनेचे शाखा अध्यक्ष निखिल वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, रोहित शेंडे, हर्षल भुरसे , वतन चिकाटे, साहील खोब्रागडे, सौरव वाढई, सुधीर वाडगुरे, प्रणय रायपुरे, चेतन दहिवले, साहिल मेश्राम, सुरज गेडाम, निहाल गेडाम, प्रितम रामटेके, निरज डोर्लीकर, सोहन दहिलकर, सौरभ वायडे अजय दहिवले, राकेश मोहूर्ले, तथा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने