Top News

चिंतामणी महाविद्यालय, पोंभुर्णा येथे "हुतात्मा दिवस" साजरा.


Bhairav Diwase.     Jan 30, 2021
पोंभुर्णा:- दिनांक 30 जानेवारी 2021, ला चिंतामणी महाविद्यालय, पोंभुर्णा येथे "हुतात्मा दिवस" साजरा करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 73 व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच चिंतामणी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स चे संस्थापक व पायारचिते सन्माननीय स्वर्गीय श्री वसंतरावजी दोंतुलवार यांच्या स्मृतिदिन कोवीड-१९ च्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्राचार्य डॉ. एन. एच पठाण सर यांनी हुतात्म्यांच्या फोटोला माल्यार्पण केले. प्रा. संजय उगेमुगे सरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनतर अध्यक्षीय भाषण कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन.एच. पठाण सर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. चौधरी सर, प्रा, उगेमुगे सर, प्रा. घोडेस्वार सर, प्रा. बावनकुळे सर, प्रा. गुडधे सर, प्रा. गिरपुंजे, प्रा. नरवाळे मॅम तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित राहून हुतात्म्यांच्या फोटोला अभिवादन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने