🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

विहिरीत मृत्यूदेह आढळला; हत्या कि आत्महत्या गूढ कायम.

गडचांदूर-आवळपुर मार्गावर देवलकर यांच्या शेतातील विहिरीत आढळला मृत्यूदेह.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
चंद्रपूर:- विहिरीत मृत्यूदेह आढळला; हत्या कि आत्महत्या गूढ कायम.

गडचांदूर-आवळपुर मार्गावर देवलकर यांच्या शेतातील विहिरीत आढळला मृत्यूदेह.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
चंद्रपूर:- आज दिनांक 30/01/2020 रोजी बिबि ते गडचांदूर ह्या मुख्य मार्गावर दिलीप देवलकर यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये एक मृतदेह आढळला व त्या व्यक्तीचे नाव निलेश कायरकर असे आहे. व तो व्यक्ती बीबी ह्या गावातील ज्ञानेश्वर माणूस मारे यांचा जावई आहे. व तो जे.एस.टी. ट्रान्सपोर्ट मध्ये अल्ट्राटेक कंपनी अवळपुर इथे सुपरवायझर या पदावर कार्यरत होता.

      तो आपल्या पत्नी व एक लहान मुलगी सहित बिबी गावात देरकर यांचे कडे किरायाने राहत होता. व काल दिनांक 29/01/2021 ला रात्री 8 ते 9 वाजताच्या दरम्यान ऑफिस चे पैसे अनन्या करिता जातो. असे घरी सांगून गेला व तो घरी परत आला नाही आणि सकाळी नेहमी प्रमाणे दिलीप देवलकर हे शेतात गेले असता त्यांना त्यांच्या शेता जवळ गाडी उभी दिसली व त्यांनी शेतात पाहणी केल्यावर तिथे त्यांना कोणीच आढळले नाही आणि ते विहिरी जवळ येऊन पाणी काढायला गेले असता त्यांना विहिरीत पेन, व चप्पल पाण्यात तरंगत दिसली व त्यांना शंका वाटली तसेच त्यांनी गावातील काही लोकांना सूचित करून बोलावून घेतले व माहिती सांगितली, गावचे पोलीस पाटील, सरपंच ह्यांना सांगितल्या नंतर लगेच घटना स्थळी सर्व दाखल होऊन पोलिसांना तत्काळ माहिती दिली.
      
    मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. आणि गाडचादुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनला नेण्यात आले. परंतु त्या व्यक्तीचे गुपित रहस्य पडद्या आड आहेत. हत्या की आत्महत्या हे स्पष्ट झाले नाही अशी चर्चा सर्व गावकऱ्याकडून केली जात आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.