🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

ढोरवासा येथे महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथुन जवळच असलेल्या ढोरवासा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी करण्यात आली.

    आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी संपूर्ण जग साजरी करीत आहे. भद्रावती येथून जवळच असलेल्या ढोरवासा येथील जिल्हा परिषद शाळेत पण आज ही पुण्यतिथी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भारत गायकवाड सर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली यावेळी शाळेच्या प्रतिभा मेश्राम या विद्यार्थिनीने गांधीजीच्या जीवनावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला तर श्रावणी निमकर हिने स्वातंत्र्यासाठी गांधीजींची झालेली हालअपेष्टा आपल्या छोटेखानी भाषण द्वारे सांगून महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला

कार्यक्रमाचे संचालन भारती हजारे हिने तर आभार प्रदर्शन यश क्षिरसागर या विद्यार्थ्यांने केले. या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री भारत गायकवाड सर, अजय गाडगे सर,दिनकर गेडाम सर, सुप्रिया कोडपे मॅडम उपस्थित होते