वरोरा:- दिनांक 13 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्राचे लोकनेते मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहिर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात वरोरा तालुक्यातील नागरी गट ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टी समर्थित शेतकरी ग्राम विकास आघाडी पॅनलच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ चौक सभा व पायदळ प्रचार कार्य संपन्न झाले. यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वामनजी तूर्के, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, युवा मोर्चा जिल्हा सचिव महेश श्रीरंग, विद्यार्थी आघाडी जिल्हा संयोजक प्रतीक बारसागडे, दादू खंगार, प्रतीक काळे, निलेश देवतळे, राहुल डागमवार, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदित्य शिंगाडे, सोशल मीडिया जिल्हा सदस्य अभिषेक सातोकर सोबतच गावातील सर्व भाजपा व युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायत उमेदवाराच्या प्रचारार्थ युवा मोर्चा चा प्रचार दौरा संपन्न.
बुधवार, जानेवारी १३, २०२१