🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

३० व ३१ जानेवारी रोजी व्हाॅलीबाॅल सामन्यांचे आयोजन.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील नवोदय स्पोर्टिंग क्लबतर्फे येथील किल्ला वार्डातील जि.प.प्राथमिक शाळेच्या पटांगणावर दि.३० व ३१ जानेवारी रोजी भव्य खुल्या पुरुष व्हाॅलीबाॅल सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या हस्ते सामन्यांचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनराज आस्वले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.तर प्रमुख अतिथी म्हणून न.प.मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, उपाध्यक्ष संतोष आमने, नियोजन सभापती सुधीर सातपुते, पाणीपुरवठा सभापती चंद्रकांत खारकर, आरोग्य सभापती निलेश पाटील, स्थायी समिती सदस्य विनोद वानखेडे,महिला व बालकल्याण सभापती रेखाताई राजुरकर, माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सामन्यांकरीता रु.५००/- प्रवेश शुल्क असून प्रथम पारितोषिक रु.१५००१/-, द्वितीय पारितोषिक रु.१०००१/- आणि तृतीय पारितोषिक रु.७००१/- ठेवण्यात आले आहे.तसेच विविध वयक्तिक आकर्षक बक्षीसे सुद्धा ठेवण्यात आलेली आहेत. नागरिकांनी या सामन्यांचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.