Top News

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना चंद्रपूर कार्यकारिणी गठित.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:-  दिनांक 24 जानेवारी 2021 ला सुमठाणा इथे श्री साहेबराव घोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेची सभा घेण्यात आली . या सभेस राज्य कार्यकारणी मधून मार्गदर्शन करण्यासाठी राज्याध्यक्ष- अनिल कुमार ढोले, हरीश खुजे, विलास डाखोळे, उज्वल रोकडे ,रामचंद्र चूकांबे, शाम ढोले* यांच्या उपस्थितीत आजची सभा पार पडली.  भविष्यात ही संघटना शासकीय व निमशासकीय सेवेत कार्यरत असणारे कर्मचारी तथा निवृत्त झालेले कर्मचारी ्यांच्यावर होणार्‍या अन्यायाची दाद मागणारी संघटना , समाजाला कायदेविषयक सल्ला, देण्यास प्राधान्य देईल. सर्व प्रकारच्या शैक्षणिक, सामाजिक कायदेविषयक मार्गदर्शन, समाजबांधव परिचय, अडी-अडचणी वर मार्गदर्शन या संघटनेमार्फत कर्मचाऱ्यांना मोफत लाभेल . त्यासाठी संघटनेचे सभासद वाढविण्यासाठी, संघटनेच्या बायलाजप्रमाणे सभासद फी  ही शंभर रुपये सभासद फी व  वार्षिक वर्गणी बाराशे रुपये ठेवण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त धनगर अधिकारी-कर्मचारी  बांधवांनी या संघटनेस जुळवून  सभासद संख्या वाढवावी व जिल्हा कार्यकारणी घटित करण्याविषयी मार्गदर्शन केले.

सभेत सर्वानुमते खालील प्रमाणे जिल्हा कार्यकारिणीचे घटित करण्यात आली.

   १. अध्यक्ष- श्री प्रवीण बुच्चे ,जिवती
   २. उपाध्यक्ष- श्री गणेश चिडे, भद्रावती
   व  संजय चिडे, राजुरा
   ३. सचिव- कैलास उरकुडे भद्रावती
   ४. कोषाध्यक्ष-अमित ठमके भद्रावती
   ५. कार्याध्यक्ष संजय राव बोधे, वरोरा
   ६. संघटक-
     प्रा. महादेवराव बरडे सर, भद्रावती,
    श्री गजाननराव शेळके मुख्याध्यापक ,वरोरा
श्री बालाजी नंदगावे,राजुरा 


श्री प्रशांत घोरूडे, भद्रावती
  वरील प्रमाणे जिल्हा कार्यकारणी सर्वांच्या उपस्थितीत गठित करण्यात आली. पुढील सभा नवनिर्वाचित अध्यक्ष प्रविण बुच्चे यांच्या कार्यक्षेत्रात (राजुरा) इथे दि. १४/०२/२०२१ ला घेऊन तालुका कार्यकारिणी ठरविली जाईल. पुढील कार्यास सर्वांना शुभेच्छा दिल्या.
  सभासदांपैकी गजानन राव शेळके, संजय राव बोधे,प्रवीण बच्चे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास उरकुडे व आभार प्रदर्शन अमित ठमके यांनी केले.
   सभेसाठी वरोरा, भद्रावती, चंद्रपूर ,राजुरा, कोरपना, नांदेड, परभणी, जिवती इथून बहुसंख्य सभासद बांधव उपस्थित होते. आजच्या सभेत निलकंठ खराबे, महेश गोरे, एकनाथ पारडकर, बाळकृष्‍ण गांवडे ,रामकृष्ण चिळे, भूपेश चिळे, सुभाष चिळे,  भगवान दंडवते, बालाजी नंदगावे, रवींद्र गावंडे इत्यादी समाजबांधव उपस्थित होते
.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने