"आधार न्युज नेटवर्क" च्या वार्ताहराचा ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय….

Bhairav Diwase
आधार न्यूज नेटवर्क परिवारातर्फे विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन.....
Bhairav Diwase. Jan 19, 2021
चंद्रपूर:- आधार न्यूज नेटवर्क चॅनेल चे बातमीदार राकेश गोलेपल्लीवार सावली तालुका प्रतिनिधी, प्रफुल तुम्मे सावली ग्रामीण प्रतिनिधी, अरविंद राऊत चिमूर तालुका प्रतिनिधी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय प्राप्त केले आहे. हे  3 उमेदवार "आधार न्यूज नेटवर्क" या न्युज पोर्टला प्रतिनिधी म्हणून काम करतात. 

आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी सावली चे वार्ताहर म्हणून काम करत आहेत. जिबगांव येथील वार्ड क्र 2 चे अधिकूत उमेदवार राकेश मधुकर गोलेपल्लीवार याचा बहुमताने विजय झाला. राकेश गोलेपल्लीवार ला 298 तर निकेश्वर कोतपलीवार यांना 146 मते मिळाले. त्यामुळे राकेश गोलेपल्लीवार यांनी 152 मतांनी विजय मिळला.

आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी सावली चे वार्ताहर म्हणून काम करत आहेत. पाथरी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 3 मधून प्रफुल राजेश्वर तुम्मे यांनी 598 मतांपैकी 331 मते घेऊन 196 मतांनी विजयी झाले. त्यात हितेश कुंभरे यांना 135 मते तर गोपाल मडावी यांना 101 मते व जितेंद्र मडावी यांना 28 मते मिळाली. 

आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी चिमुर चे वार्ताहर म्हणून काम करत आहेत. चिचाळा (शास्त्री) ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 3 मधून अरविंद राऊत यांनी 227 मतांपैकी 166 मते घेऊन विजयी झाला आहे. प्रेमदास राऊत यांना 61 मते मिळाली. अरविंद राऊत यांनी 105 मतांनी विजयी झाले.

आधार न्यूज नेटवर्क परिवारातर्फे विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन.....