पुण्यात मुलाला भेटायला जाताना पती-पत्नी ठार.
Bhairav Diwase. Feb 24, 2021
यवतमाळ:- कल्याण-विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गावर गेवराई तालुक्यातील मातोरी गावाजवळ कार अपघातात दाम्पत्य ठार झाल्याची घटना बुधवारी (ता.24) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. ममता तगलपल्लेवार आणि विलास तगलपल्लेवार ( रा.पुसद, जि.यवतमाळ) असे अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
ममता या राज्याचे माजी अर्थमंत्री तथा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहिण होती. पुण्यात राहणाऱ्या अतुल या मुलाला भेटण्यासाठी हे दाम्पत्य पुण्याला जात होते.
त्यावेळी मातोरीजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. परिसरातील लोकांनी दोघांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात आणले. चकलंबा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.