🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

सततच्या नापिकीमुळे तरुण शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या.


Bhairav Diwase.     Feb 03, 2021
कोरपना:- राज्यात आत्महत्याचे सत्र सुरूच असून, काल पुन्हा एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोरपना या तालुक्यात उघडकीस आली आहेत.  कोरपना तालुक्यातील निमनी येथील युवा तरुण शेतकरी मंगेश तिखत यांनी सततच्या नापिकीमुळे आणि कर्जाच्या ओझ्याखाली असल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नापीकी झाल्यामुळे पुढे काय करायचे? शेती कसे कसायची? जीवन कसे जगायचे?, पोट कसे भरायचे? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा? या विचार चक्रात त्यांनी शेवटी हतबलतेपोटी आणि नैराश्य ग्रस्त होऊन त्यानी आपल्या शेतातच विष प्राशन करुन घेतले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी गडचांदूर येथे नेत असतांना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
     
या तरुण शेतकऱ्यामागे आई वडील, पत्नी आणि एक तीन वर्षांची मुलगी आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावर्षी सुरुवाती पासूनच निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून सर्व पिके निघून गेले. कपाशी पासून आशा होती त्यावरही बोंडअळीने आक्रमण केले.