🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

व्हॅलेंटाईन डे निमीत्त तुमच्या बाबू, शोना, जानुला फ्री कुपनच्या लिंक पाठवताय, मग ही बातमी नक्की वाचा........


Bhairav Diwase.     Feb 03, 2021
प्रेमी युगुलांचा दिवस अर्थात व्हेलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर असल्याने तरूणाईकडून हा दिवस साजरा करण्याकरता जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. आपल्या प्रेयसीला किंवा प्रियकराला कोणती भेटवस्तू द्यायची, कुठे फिरायला जायचे याचं प्लानिंग देखील झाले असेल? दरम्यान, सोशल मीडियावर एक मॅसेज चांगलाच व्हायरल होत आहे. व्हेलेंटाइन डे निमित्त ताज हॉटेल्स प्रेमी युगुलांना खास भेट देणार असल्याचे या मेसेजमध्ये सांगितले आहे. परंतु, हा व्हायरल होत असलेला मॅसेज पूर्णतः खोटा असून याचा खुलासा ताज हॉटेल्स आणि मुंबई पोलिस गुन्हे शाखा यांच्याकडून करण्यात आला आहे.

 असा आहे व्हायरल मॅसेज........

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मॅसेज नागरिकांना व्हॉट्सअॅपवरुन येत आहेत, ज्यात असे म्हटले आहे की,  "मला ताज हॉटेलकडून गिफ्ट कार्ड मिळालं आहे आणि अखेर ताज हॉटेलमध्ये ७ दिवस फ्री मुक्काम करण्याची संधीही मिळाली आहे." या व्हायरल होणाऱ्या मॅसेजसह एक लिंक देखील पाठविली जात आहे.


पोलिसांकडून अलर्ट राहण्याच्या सूचना....


 ताज हॉटेलकडून व्हेलेंटाइन डे निमित्त कूपन अथवा गिफ्ट कार्ड भेट देण्यात येत आहे, असा मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये प्रेमीयुगुल ताज हॉटेल्समध्ये ७ दिवस फ्रीमध्ये मुक्काम करू शकतात. परंतु, हा मॅसेज खोटा आहे. असे कोणतेही कूपन किंवा गिफ्ट कार्ड हॉटेलकडून देण्यात येत नाही. असा मेसेज आल्यावर त्यावर विश्वास ठेऊ नका. मेसेजमध्ये जी लिंक देण्यात येत आहे ती ओपन करू नका. या लिंकला क्लिक केल्यास तुमची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी या लिंकविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच अशी लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नका, असे आवाहन सायबर पोलिस ठाणे, गुन्हे शाखा मुंबई यांनी केले आहे.