पं. दीनदयालजी एकात्म मानववादाचे प्रणेते, पंडितजींचे अंत्योदयाचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कार्यरत:- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे.
चंद्रपूर:- एकात्म मानववादाचे प्रणेते, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक पं. दीनदयाल उपाध्याय यांची आज पुण्यतिथी निमित्त घुग्गुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात पंडितजींच्या प्रतीमेस अभिवादन करण्यात आले. भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पं. दीनदयालजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले अंत्योदयाचे प्रणेते पं. दीनदयालजी यांची पुण्यतिथी समर्पण दीन म्हणून साजरी करण्यात येत आहे. त्यांनी अंत्योदयचा नारा दिला.समाजाच्या शेवटच्या माणसाचे कल्याण व्हावे. तळागाळातील सामान्य व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा हा आदर्श पं. दीनदयालजीनी दिला. ते आठवण करण्याचा हा दिवस आहे. आम्ही पं. दीनदयालजींचे अंत्योदयाचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यरत आहोत.
या प्रसंगी समर्पण निधी गोळा करण्यात आला. यावेळी भाजपा युवामोर्चा महामंत्री विवेक बोढे, माजी पं.स.उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोबडे, साजन गोहणे, भाजपा नेते बबलू सातपुते, विवेक तिवारी, असगर खान, विनोद जंजर्ला, रवींद्र कामतवार, लक्ष्मण ठाकरे, रोहित मंडल, विजय माथणकर, इर्शाद शेख, मोसीम शेख, देवानंद शेंडे, निशा उरकुडे, सुनंदा लिहीतकर, प्रीती धोटे, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, अंकिता सोनटक्के, मोहनीश हिकरे, उमेश दडमल उपस्थित होते.