शुभम फुटाणे हत्याकांडातील आरोपीस फाशी देण्यासाठी घुग्घुस वासियांचा "आक्रोश मोर्चा."

Bhairav Diwase
प्रचंड जनआक्रोश रस्त्यावर उतरला.

घुग्गुस पोलीस प्रशासना विरुद्ध तीव्र रोष.
Bhairav Diwase.      Feb 15, 2021
चंद्रपूर:- रविवार 14 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता रामनगर राममंदिर येथून शुभम फुटाणे हत्याकांड प्रकरणी पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ "कॅॅंडल मार्च" घुग्गुस वासियांन कडून काढण्यात आला.

राममंदिर जवळ मोठ्या संख्येत महिला, लहान मुले व पुरुष गोळा झाले. तिथे दोन मिनिट मौन पाळून शुभमला श्रद्धांजली देण्यात आली. हातात पेटलेल्या मेणबत्या व मशाली घेऊन कॅॅंडल मार्च राजीव रतन चौक, नवीन बसस्थानक चौक, जुना बसस्थानक मार्गे गांधी चौक येथे धडकला तिथे पोलीस प्रशासन हाय हाय, सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी द्या अशी प्रचंड नारे बाजी व घोषणा बाजी करण्यात आली.

गांधी चौकात शुभमच्या प्रतिमेसमोर मेणबत्या लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येत घुग्गुस वासिय सहभागी झाले होते.

आक्रोश मोर्चा हा शांततेत पार पडला यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसानी अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगा नियंत्रण पथक बोलाविले होते तसेच पोलीस बंदोबस्त ठेवला होता.