🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

भद्रावतीत भाजपचे विज वितरण कार्यालयाला टाळा ठोको आंदोलन.

विज बिल माफ न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:-  राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी आधी कोरोना काळातील विज बिले माफ करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर त्यांनी घुमजाव केले. विज वितरण कंपनीही ग्राहकांना अवास्तव बिले पाठवून कोरोना प्रार्दुभावात आधीच हतबत झालेल्या ग्राहकांना आणखी आर्थिक खाईत लोटले. त्याच्या निषेधार्थ भद्रावती येथील भाजपा का‌र्यकर्त्यांनी आज दि.५ जानेवारी रोजी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात ताला ठोको आंदोलन केले.

                 विज वितरण कंपनीतर्फे ग्राहकांच्या मागे विज बिल भरण्यासाठी तगादा लावीत विज बिल न भरल्यास विज कनेक्शन तोडण्यची नोटीसही बजावली आहे. ग्राहकांवर एवढा अन्याय विज वितरण कंपनीकडून केल्या जात असतांनाही राज्यातील आघाडी सरकार मात्र शांतपणे मुग गाळून सर्व तमाशा पहात आहे. त्यामुळे ग्राहकांचे कोरोना काळातील विज बिल माफ करण्याची मागणी करीत भद्रावती भारतीय जनता पक्षातर्फे स्थानिक विज वितरण कार्यालयासमोर कंपनीच्या विरोधात निदर्शने करीत कंपनीच्या मुख्य गेटला ताला ठोकण्यात आला. यावेळी राज्यातील आघाडी सरकारचा निषेध करून शासणाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व विज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता यांना विज बिल माफ करण्यासाठी निवेदन देण्यात आले. व विज बिल माफ न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. 
                    सदर आंदोलनात भाजपचे चंद्रकांत गुंडावार जिल्हा उपाध्यक्ष भाजपा चंद्रपूर, प्रवीण सातपुते शहर अध्यक्ष भद्रावती, किशोर गोवारदीपे शहर महामंत्री, नरेंद्र जीवतोडे तालुका महामंत्री, विजय वानखेडे, विद्या कांबळे, प्रणिता शेंडे, लता भोयर, सुनंदा माणुसमरे, प्रशांत डाखरे, इम्रान खान, अमित गुंडावार, माधव बांगडे, केतन शिंदे, अनंता ताठे, योगेश गाडगे व अन्य भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.