Top News

पोंभुर्णा पंचायत समिती चे संवर्ग विकास अधिकारी मा. साळवे साहेब यांच्या हस्ते उन्नती पशुखाद्य विक्री केंद्राचे उद्घाटन.

पोंभुर्णा तालुक्यातील पशुसखींचा अभिनव उपक्रम.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- दिनांक ४/२/२०२१ रोजी जीवनोन्नति प्रभाग संघातील उन्नती पशुखाद्य विक्री केंद्राचे उद्घाटन मा. साळवे संवर्ग विकास अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. 

     महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ता.अ.व्य.कक्ष पोंभुर्णा अंतर्गत घोसरी-चिंतलधाबा प्रभागातील जीवनोन्नती प्रभाग संघा अंतर्गत एकूण २५ गावात महिला सक्षमिकरणाचे काम मागिल ४ वर्षापासून सुरु आहे. या प्रभागात आज घड़ीला ३५० स्व.सा.समूह, १६ ग्रामसंघ, १ प्रभाग संघ, अशी रचना तयार झालेली आहे. उमेद अभियानातील दशसुत्री मधील १० वे सूत्र म्हणजे शाश्वत उपजीविका आणि या सूत्राला गवसनी घालण्यासाठी अभियानाने कृषिसखी, पशुसखी, मत्स्यसखी, अशा उपजिवीका संसाधन व्यक्तीची निवड केलेली आहे. त्यातील एक संसाधन व्यक्ती म्हणजे पशुसखी. घोसरी-चिंतलधाबा प्रभागातील जवळपास २० गावामधे या पशुसखीच्या माध्यामातून आधुनिक शेडी पालन व कुकुटपालन चे महत्वपूर्ण कार्य सुरु आहे. मागील ३ वर्षापासून या पशुसखी आप शआपल्या  गावातील शेडीपालक लोकांकडे असलेल्या शेडी, मेंढ्या, कोंबड्या यांचे लसीकरण, जंतुनाशक, गोठा व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन इत्यादी कार्य करीत आहेत. परंतु हे कार्य करुण पशुपालक लोकांचे उत्पन्न वाढवित असताना आपली स्वत:ची सुधा उपजिवीका सुरु करावी हा विचार सतत मनात घुमत होता. याचीच पूर्तता म्हणून पशुसखीनी एकजुट होऊन आपले स्वत:चे उन्नती पशुखाद्य विक्री केंद्र सुरु केले. या पशुखाद्य विक्री केंद्रात पशुना लागणारे सर्व खाद्य, औषधी, उपलब्ध केले आहे. पशुसखघना या शिखरावर पोचवित असताना समुदाय पशु व्यवस्थापक किशोर माहोरकर यांनी मोलाचे तांत्रिक सहकार्य केले. तसेच तालुका अभियान व्यवस्थापन श्री. राजेश दूधे, प्रभागाचे समन्वयक श्री. निलेश अहिरकर, प्रभाग संघ व्यवस्थापक सौ. विमल वाकुड़कर, प्रभाग संघ अध्यक्ष सौ. पोरटे ताई, सचिव सौ. शीला ताई यांची प्रेरणा व सहकार्य अद्भुत ठरले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने