🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

मुलीच्या लग्नाच्या दिवशीच आईवर काळाचा घाला.


Bhairav Diwase.    Feb 06, 2021

चंद्रपूर:- मुलीचा शुक्रवारी सायंकाळी विवाह होणार होता. त्यापूर्वीच पहाटेच तिच्या आईवर काळाने घाला घातला. ही दुर्दैवी घटना तुकूम परिसरात घडली.

सुनीता दुर्योधन (५७) असे त्या मातेचे नाव आहे. सुनीता यांच्या मोठ्या मुलीचे शुक्रवारी सायंकाळी लग्न होते. त्याकरिता लग्नाचा मंडप, घराची सजावट, गुरूवारी हळदीचा कार्यक्रम नाच, गाणे असे लग्नाचे सारे सोपस्कार पूर्ण झाले होते. घरात आनंदाचे वातावरण होते. एवढ्यात गुरुवारी रात्री सुनीता यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आणि लग्नाच्या दिवशीच शुक्रवारी पहाटे अकस्मात त्यांचा मृत्यू झाला.

मन सुन्न करणाऱ्या या घटनेने दुर्योधन परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. तुकूम परिसरात सर्वत्र शोककळा पसरली होती. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. ज्या स्वतःच्या घरातून आज मुलीच्या लग्नाची वरात निघणार होती तेथून मुलीच्या मातेची अंत्ययात्रा निघाली. त्या चंद्रपूर वीज केंद्रातील मुख्य अभियंत्याच्या कार्यालयात कार्यरत होत्या. त्यांच्या सेवानिवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक होते.

Popular posts......लोकप्रिय पोस्ट ......

गडचिरोली -चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीत प्रेमीयुगलांनी मारली उडी.....

आनंदवन येथे डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या.

चंद्रपूरांनो सावधान! 500 रु. तर मिळणार नाहीत, पण गंडा कितीचा बसेल सांगताही येणार नाही.

राजुरा ब्रेकिंग न्यूज; राजु यादव हत्याकांडातील आरोपींना अटक. 
http://www.adharnewsnetwork.com/2021/02/blog-post_45.html?m=1