🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

ग्रामसेवक काझी यांना मुधोलीवासियांतर्फे भावपूर्ण निरोप.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील मुधोली येथील ग्रामसेवक वाय.क्यु.काझी यांना सेवानिवृत्तीनिमित्य मुधोलीवासियांतर्फे भावपूर्ण निरोप देण्यात आला.
          
ग्राम पंचायतीच्या सभागृहात आयोजित या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तुळशीराम श्रीरामे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच केशवराव जांभुळे, बंडू नन्नावरे, सरपंच बेबीताई चावरे, उपसरपंच ज्ञानेश्वर दडमल,सत्कारमूर्ती काझी मंचावर उपस्थित होते.

             सर्वप्रथम तुळशीराम श्रीरामे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ग्रामसेवक काझी यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला.यावेळी काझी यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

                    कार्यक्रमाचे संचालन नितेश सिडाम यांनी केले. तर आभार बेबीताई चावरे यांनी मानले.कार्यक्रमाला माजी व नवनिर्वाचित ग्रा.पं.सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.