🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

बसला साईड देताना दुचाकीची बैलगाडीला धडक.



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- तालुक्यातील चंदनवाही गावाजवळ मोटरसायकलने गावाकडे जाताना समोरून बस आली. बसला साईड देत असताना अचानक शेतातून बैलगाडी रस्त्यावर आल्याने दुचाकीची बैलगाडीला धडक बसली. त्यानंतर बैलगाडी उलटून दुचाकीस्वाराच्या अंगावर आली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.


नामदेव मारोती घोटेकर रा. चंदनवाही असे मृताचे नाव आहे. गुरुवारी रात्री नामदेव घोटेकर हे दुचाकीने गावाकडे जात होते. या दरम्यान समोरून बस आल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूने घेतली. त्याच वेळी शेतातून बैलगाडी अचानक रस्त्यावर आली आणि दुचाकीने बैलगाडीला जोरदार धडक दिली. यावेळी ही बैलगाडी उलटून नामदेव यांच्या अंगावर पडल्याने ते जबर जखमी झाले. राजुरा ग्रामीण रूग्णालयात जाईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. नामदेव घोटेकर हे चंदनवाही येथे पोस्टमन म्हणून कार्यरत होते. या महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ व मोठा आप्तपरिवार आहे. या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

Popular posts......लोकप्रिय पोस्ट ......

गडचिरोली -चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीत प्रेमीयुगलांनी मारली उडी.....

आनंदवन येथे डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या.

चंद्रपूरांनो सावधान! 500 रु. तर मिळणार नाहीत, पण गंडा कितीचा बसेल सांगताही येणार नाही.

राजुरा ब्रेकिंग न्यूज; राजु यादव हत्याकांडातील आरोपींना अटक.