Top News

श्री. शशांक नामेवार उत्कृष्ट महाविद्यालयीन कर्मचारी म्हणून उच्च शिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांचे कडून सन्मानित.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- येथील शरदराव पवार कला  व वाणिज्य  महाविद्यालय  गडचांदूर चे मुख्य लिपिक श्री.शशांक शंकरराव नामेवार यांना गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार(संलग्नित महाविद्यालये) प्राप्त झाला त्याबद्दल नुकताच विद्यापीठाच्या दशमाणोत्सव निमित्त आयोजित डाटा सेंटर उदघाटन व मॉडेल कॉलेज भूमिपूजन कार्यक्रमात श्री  शशांक शंकरराव नामेवार यांना    महाराष्ट  राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना. उदय सामंत  यांनी ५000 रुपये राशी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आहे याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी,आमदार देवरावजी  होळी शिक्षण  संचालक डॉ. धनराज माने तंत्र शिक्षण संचालक डॉ.अभय वाघ आणि प्रभारी कुलसचिव डॉ. अनिल चिताडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्री शशांक नामेवार हे महाविद्यालयातील उपक्रमशील आणि क्रियाशील मुख्य लिपिक असून अनेक उपक्रमात आणि कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. महाविद्यालयातील विविध विस्तार कार्य एन. एस.एस तसेच समाजोपयोगी कार्यामध्ये श्री नामेवार यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.  त्यांचा अनेक सामाजिक आणि शैक्षणिक  संस्थांची निकटचा संबंध असून अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये ते सक्रिय आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाले, तुळशीरामजी पुंजेकर, नामदेवराव बाबडे, नोगराजजी मंगरूळकर, माधवराव मदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह समन्वयक डॉ.संजय गोरे  डॉ. दुधगवळी, डॉ.बिडवाईक, डॉ.गायधनी, डॉ.बेलोरकर, डॉ.कु.मसराम,डॉ.सिह, प्रा.करंबे, नळे, उरकुडे,भोयर, बुऱ्हाण, टेकाम, पोहाणे, चांदेकर, पांडे, कुलमेथे इ. अभिनंदन केले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने