🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

"चोर-चोर भाऊ-भाऊ, रेती तस्करीची मलाई वाटून खाऊ"

वन विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कोष्टाळा परिसरातील रेतीची खुलेआम तस्करी?
 (आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- वन विभागाच्या निष्काळजीपणा व वनाधिकारी यांच्या आशीर्वादाने राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन या भागातील नाल्यातून खुलेआम रेतीची तस्करी सुरू असून या परिसरात रेती तस्करांनी अनेक ठिकाणी अवैधरित्या रेती साठवून ठेवल्याची माहिती आहे.
          कोष्टाळा बिटातील नाल्यातून दररोज पाच ते सहा ट्रॅक्टर राजरोसपणे रेतीची चोरी करीत असून यावर कुणाचाही वचक नाही. रेती तस्कर मुक्तपणे हा व्यवसाय करीत असून त्यांना वन विभागातील अधिकाऱ्यांचा आशीर्वाद प्राप्त असल्याची परिसरात चर्चा आहे.
               सोबतच कोष्टाळा जंगलातील बगलवाही परिसरात पुलांवरचे बांधकाम वन विभागातर्फे चालत असल्याचे समजते. त्या कामाकरिता लागणारी रेती ही कोष्टाळा  बीटातील नाल्यातून अवैधरित्या घेतल्या जात असल्याची चर्चा आहे. अवैध रेती तस्करीसाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर हे कुणाच्या मालकीचे आहे हे लवकरच स्पष्ट होण्याचा मार्गी आहे. कोष्टाळा येथील वन विभागातील अधिकाऱ्यांचा आशीर्वादाने हे कृत्य घडत असल्याचे परिसरात बोलल्या जात आहे. "चोर चोर भाऊ भाऊ रेती तस्करीची मलाई वाटून खाऊ" या संकल्पनेतुन वन विभाग अधिकारी तस्करांसमोर नतमस्तक झाल्याचे दिसून येत आहे.
                    रेती तस्करांचे वन विभाग व विभागांतील अधिकारी लोकांशी अर्थपूर्ण असलेले संबंध रेती चोरांचे मनोबल वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
                                               क्रमशः

Popular posts......लोकप्रिय पोस्ट ......

गडचिरोली -चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीत प्रेमीयुगलांनी मारली उडी.....

आनंदवन येथे डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या.

चंद्रपूरांनो सावधान! 500 रु. तर मिळणार नाहीत, पण गंडा कितीचा बसेल सांगताही येणार नाही.

राजुरा ब्रेकिंग न्यूज; राजु यादव हत्याकांडातील आरोपींना अटक.