जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येणापुर, या संस्थेच्या लोगोचे लोकार्पण सोहळा संपन्न.

Bhairav Diwase
मा. आमदार डॉ.देवराव होळी साहेब (गडचिरोली विधानसभा क्षेत्र ) यांच्या हस्ते.

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- आज दिनांक 6/2/2021 रोज शनिवार ला जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येणापुर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली या सामाजिक  संस्थेच्या लोगो चे लोकार्पण मा. आमदार डॉ. देवराव होळी साहेब (गडचिरोली विधानसभा क्षेत्र) यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार साहेबांनी मार्गदर्शन करताना संस्थेच्या पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी दिलीप चलाख, संस्थेचे अध्यक्ष वैभव बुरनवार, संस्थचे सचिव लुकेश सोमनकर, कोषाध्यक्ष रविंद्र बंडावार, स्वामी विवेकानंद युवा मंडळ विठ्ठलपूर चे सचिव बालाजी मदासवार, आशा मुळे, एस. जी. रामटेके उपस्थित होते. तसेच लोगो चे डिझायनर होमदेव कुरवटकर यांनी केले.