🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

किरायदार विद्यार्थ्याने चोरले घरमालकाचे अडीच लाख रुपये.


Bhairav Diwase.     Feb 05, 2021
चिमूर:- येथील प्रगती कॉलोनी, माणिक नगर मध्ये किरयाने राहणाऱ्या व उच्च शिक्षण घेत असलेल्या आरोपीला अडीच लाख रुपये चोरीच्या आरोपावरून अटक करण्यात आली. आरोपी तालुक्यातील खुटाळा येथील सचिन तुकडू मसराम(24) असून तो चिमुरला एम.ए. अर्थशास्त्र ही पदव्युत्तर पदवी घेत आहे. पोलिसांनी त्याला अवघ्या दोन दिवसात शोधुन गजाआड केले.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी चिराग काथोडे हे प्रगती नगर येथील अनील वाघे यांच्या घरी किरयाने राहत होते. ते ग्रॅनाईट मारबल चा हॉलसेल दराने विक्री चा व्यवसाय करतात. त्याच घरात आरोपी किरायने राहत होता. घटनेच्या दिवशी फिर्यादी चिराग काथोडेने स्कूल बॅग मधे अडीच लाख रुपये ठेवले होते. ही घटना कुणालाही माहीत नव्हती मात्र आरोपी मसराम चे नियमित येणे जाणे फिर्यादी च्या घरी सुरू होते. मात्र चोरीच्या घटनेच्या दिवसी पासून फिर्यादी राहत असलेल्या घरून आरोपी गायब होता.
त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला असता आरोपी घटनेच्या दिवसापासून नागपूर येथे वास्तव्यास असल्याचे आढळून आले. पोलीस अधिकारी बगाटे,पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पी.एस.आई.अलीम शेख,हेड कॉन्स्टेबल निंमगडे,पो.हवा. विनायकराव सरकुंडे, सचिन गजभिये,शैलेश मडावी यांनी तपासाला वेग देवून आरोपीला अटक केली. त्याचे कडून 2लाख25 हजार रु जप्त केले आहेत. आरोपी विरुद्ध भ.द.वि.454,457,380 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.