🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

प्रियकराने प्रेयसीवर पेट्रोल टाकून पेटवलं, पेट घेताच तिने त्याला मिठी मारली. आणि.........

अंगावर थरकाप उडवणारी घटना.
मुंबई:- प्रेमसंबंधाला नकार दिल्याने तरुणीला तिच्याच नात्यात असणाऱ्या विजय खांबे प्रियकराने प्रेयसीवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणाने प्रेयसीला पेटवून दिल्यानंतर तिने त्याला घट्ट मिठी मारली. यात तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा (08 फेब्रुवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाला. घडल्याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी मृत प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करणार आहेत.

मृत तरुणी निलिमा पाचखळे ही जोगेश्वरी परिसरात राहत होती. ती वडाळा येथे घरकाम करायची. तिचे मृत तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याचा स्वभाव घरच्यांना आवडत नव्हता. त्यामुळे त्या दोघांच्या लग्नाला विरोध होता. लग्नाबाबत त्या दोघांची समजूत काढली गेली होती.

त्यानंतर मृत तरुणीने तिचे तरुणासोबतचे सर्व संबंध तोडून टाकले होते. मृत तरुण हा तिला खूप त्रास देत असायचा. त्या त्रासाला तरुणी कंटाळली होती. 

(06 फेब्रुवारी ) शुक्रवारी तरुणी ही एकटीच घरात होती. ती एकटी घरात असल्याचे पाहून मृत तरुण तेथे आला. त्याने तिला पुन्हा प्रेमसंबधासह लग्नाविषयी विचारणा केली. तेव्हा तरुणीने त्याला नकार दिला. नकार दिल्यावर त्या दोघांत शाब्दिक वाद झाला. त्याने त्याच्याकडील पेट्रोल तरुणीच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले. पेटवून दिल्यानंतर तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्यात ते दोघे भाजले गेले.

या घटनेची माहिती समजताच स्थानिकांनी त्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्या तरुणाचा मृत्यू झाला. तर तरुणी 90 टक्के भाजली गेल्याने तिला जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते. (08 फेब्रुवारी) दुपारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत तरुणाविरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला आहे.