सरपंच पदी पुनम चुधरी, तर उपसरपंच पदी राहुल पाल यांची निवड.
पोंभुर्णा:- जुनगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजयुमो तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ पाल यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी ग्रामीण विकास आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून आले. आज सरपंच व उपसरपंच पदी निवड पार पडली. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ जुनगाव ग्रामपंचायत सरपंच पदी पुनम राहुल चुधरी तर उपसरपंच पदी राहुल काशिनाथ पाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली व सदस्य पदी विसवेस्वर नानाजी भाकरे, तेजपाल आनंदराव रंगारी, सोनी चंद्रकांत चुधरी, पलवी किशोर देशमुख, माधुरी प्रकाश झबाडे विजयी झाले आहे. ७ पैकी ७ उमेदवार विजयी होऊन ग्राम पंचायत जुनगाव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला होता. जुनगाव गावातील मतदार बंधू भगणींचे विजयी उमेदवारांने जाहीर आभार मानले.
सरपंच पदी पुनम चुधरी, तर उपसरपंच पदी राहुल पाल यांची निवड झाल्याबद्दल माजी अर्थ तथा वन नियोजन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराजजी अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी, भाजयुमो तालुकाध्यक्ष अजय मस्के, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष निलेश चिंचोलकर यांनी अभिनंदन केले.