🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

भटाळी ग्रामपंचायतीवर 20 वर्षांपासून राष्ट्रवादीची एक हाती सत्ता.

सरपंच सुधाकर रोहनकर, उपसरपंच दीपक मडावी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील भटाळी येथील ग्राम पंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या आज दि.१२ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने आपली एक हाती सत्ता कायम ठेवली असून सलग २० वर्षे सत्तेत राहण्याचा रेकाॅर्ड केला आहे.
               
    निवडणूक अधिकारी एल.आर.लेंगरे, ग्रामसेवक बोधनकर आणि तलाठी शास्त्रकार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सरपंच पदाच्या  निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सुधाकर रोहनकर, तर उपसरपंच पदी राष्ट्रवादी काॅंग्रेसचेच दीपक मडावी यांची अविरोध निवड करण्यात आली. 
                        
   यावेळी सदस्य निलिमाताई रोहनकर, गीता ताजने, सविता झाडे, ज्योत्सना तुरारे, नरेश वानखेडे उपस्थित होते. निवड होताच सर्व सदस्यांचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.यावेळी पी.के.मनोहर, विलास सातपुते, भानुदास झाडे,  अरुण देवतळे,  विठ्ठल पा. तुरारे, पुरूषोत्तम तुरारे,भाऊराव सातपुते, बंडू तुरारे, गणपत पा.सातपुते,देवराव मडावी, रमेश ताजने,अजाबराव सातपुते,सदू ताजने, विजय हिरादेवें,कर्मचारी विजय ताजने,संदीप थेरे आणि समस्त गावकरी उपस्थित होते.नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य आणि  राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवानेते मुनाज शेख यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.