Chandrapur Congress: चंद्रपुर काँग्रेस : वडेट्टीवार-धानोरकरांमधील वाद मिटला!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षांतर्गत असलेला वाद अखेर संपल्याचे दिसत आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबतचे सर्व मतभेद संपल्याची अधिकृत घोषणा केली आहे.


कॉंग्रेसच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. पक्षातील अंतर्गत वाद आणि भांडणं बाजूला सारून सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला.


चंद्रपूरपासूनच या नव्या युद्धाची आणि समन्वयाची सुरुवात करत असल्याचे सांगत, वडेट्टीवार यांनी थेट खासदार प्रतिभा धानोरकर यांचे नाव पुकारत त्यांच्यासोबतचे सर्व मतभेद आता संपुष्टात आल्याचे जाहीर केले. गेल्या काही काळापासून चंद्रपूरच्या राजकारणात वडेट्टीवार आणि धानोरकर समर्थकांमध्ये विविध मुद्द्यांवरून अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र, आता या जाहीर घोषणेमुळे चंद्रपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
आगामी राजकीय वाटचालीसाठी मतभेद गाडून एकत्र काम करण्याचा हा संदेश काँग्रेस पक्षासाठी दिलासादायक मानला जात आहे.