दोन तरूणांच जागीच मृत्यू.
मुल:- चंद्रपूर मूल मार्गावरील जानाळा जवळ एका दुचाकी वाहनास ट्रकने धडक दिल्यांने दोन तरूणाचा जागीच मृत्यू झाला. मृतक दोनही युवक हे मारोडा येथील रहीवासी असल्यांची प्राथमिक माहिती असून, मृतकांचे नांव प्रदिप वसंत मानकर (35), व विनोद तुळशीराम मानकर (28) असे आहे.
चंद्रपुर -मूल महाममार्गावर भीषण अपघात झाला यात मारोडा येथील तिघांचा समावेश आहे. दोन जागीच ठार तर एक गंभीर जखमी आहे. मृतकांमध्ये प्रदीप मानकर ,वसंत मानकर तर जखमी मध्ये गणेश वैरागडे यांचा समावेश आहे. तिघेपन अजयपूर येथे मिस्त्री कामाला जात होते. परत येत असताना यांचा अपघात झाला.
मारोडाचे सहा युवक तीन दुचाकीवरून येत असतांना, दोन दुचाकी सुखरूप बाहेर निघाल्या मात्र प्रदिप व विनोदला काळानी हिरावून नेले. अपघात झाल्यानंतर, ट्रक चालक फरार झाला.