Click Here...👇👇👇

जीवनातील विविध पैलूला भविष्यात शब्दांकूर फॉऊडेशन स्पर्श करेल:-विजय वाटेकर

Bhairav Diwase
शब्दांकूर फौंडेशनचा लोगो अनावरण कार्यक्रम संपन्न.
Bhairav Diwase.       Feb 02, 2021
चंद्रपूर:- विद्यार्थी व नवसाहित्यिक यांना चालना देण्यासाठी 'शब्दांकूर फॉऊडेशन'ची स्थापना करण्यात आली."ध्यास एक परिवर्तनाचा" हा ब्रीद घेऊन समाजाची शैक्षणिक,सामाजिक उन्नती व्हावी यासाठी समाजोपयोगी कार्याचे आयोजन करण्यात येणार आहेत यासाठी गूगल मिटच्या माध्यमातून शब्दांकूर फौंडेशनच्या लोगोचे अनावरण कार्यक्रमाप्रसंगी प्रथमतः दीपप्रज्वलन व ग्रंथपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उदघाटक म्हणून पुण्यातील ज्येष्ठ साहित्यिक मा.दिगंबर शिंदे उर्फ शब्दधन डी. बी.यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करण्यात आले.नवनिर्मितीतून विद्यार्थी व नवसाहित्यिक यांना आनंद देण्यासाठी 'शब्दांकूर फौंडेशन' नक्कीच कार्य करेल असा आशावाद उदघाटनीय मनोगतातून व्यक्त करण्यात आला.
                 लोगो अनावरण व कार्य शुभारंभ या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक तथा पुढील तपासकार मा.विजय वाटेकर सर यांनी जीवनातील विविध अंगांना स्पर्श करणारा शब्दांकूर फौंडेशन ठरेल अशी अभिव्यक्ती अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केला.विशेष अतिथी म्हणून 'रयतेचा वाली' या डिजिटल शैक्षणिक दैनिकाचे मुख्य संपादक शाहू भारती यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या त्याचसोबत साहित्यात प्रांतात सदैव सोबतीला असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व मा.धनंजय साळवे साहेब संवर्ग विकास अधिकारी प.स.पोंभुरणा हे देखील उपस्थित होते.        शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक,नाट्य,सांस्कृतिक, ग्रामविकास,महिला सक्षमीकरण,आरोग्य,शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रात कार्य करण्याचे आश्वासन प्रास्ताविकेतून दुशांत निमकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर चलाख तर आभार प्रदर्शन राजेश्वर अम्मावार सरांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत खुसपुरे,राकेश शेंडे,सौ.उषा निमकर,आशिष ढवस या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.सदर कार्यक्रमाला जीवन गौरव मासिकाचे सहसंपादक तसेच काव्यरसिक,साहित्यिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.