🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा.


Bhairav Diwase.     Feb 02, 2021
चंद्रपुर:-  माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बंद दाराआड बैठक झाली आहे. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. बैठकीत फक्त माझ्या मतदार संघतील विकासकामांसंदर्भात चर्चा झाली. तसंच चंद्रपूर जिल्ह्यातील विहिरगाव व मूर्ती येथील प्रस्तावित ग्रीनफिल्ड विमानतळाच्या वनजमिनी हस्तांतरणा बाबत फेरप्रस्ताव केंद्राकडे सादर करावा या व जिल्ह्यातील इतर प्रश्नांबाबत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.

आजच्या अचानक भेटीनं ज्यांना राजकीय चर्चा करायची त्यांना करू द्या, बैठकीत फक्तं माझ्या मतदारसंघतील विकास कामांसंदर्भात चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळासंदर्भातदेखील चर्चा झाली, अशी सुधीर मुनगंटीवार यांनी माहीती दिली. परंतु माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या आजच्या बैठकीनंतर भविष्यात नेमेके कोणते राजकीय समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात तयार होत आहे. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.