नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.   Feb 28, 2021
चंद्रपूर:- घुग्गुस येथील नगर परिषेद कार्यालयात आरोग्य सुपरवायझर म्हणून कार्यरत असणारे मृतक मोहन प्रमोद गुंदे वय 32 वर्ष रा.अमराई वॉर्ड घुग्गूस असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. मोहन हा अमराई येथे भाड्याच्या घरात किरायाने राहत होता त्याने सकाळ पासून घराचे दार उघडले नव्हते त्याची बहीण दुपारी एक वाजता दरम्यान घरी आली व मोहनला आवाज दिला परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणून त्याच्या बहिनेने खिडकीतून डोकावून पाहिले असता मोहन हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला व याची खबर पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला व मर्ग दाखल करून शव जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे पुढील तपास घुग्गूस पोलीस करीत आहे.