काळी-पिवळी ड्रायव्हर ने मागे पुढे न पाहता अचानक आपल्या बाजूचे दार उघडले.

Bhairav Diwase
0
दरवाज्याला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू.
Bhairav Diwase.      Feb 28, 2021
वरोरा:- शहरातील बोर्डा चौक हे वर्दळीचे ठिकाण येथून चंद्रपूर कडे करणाऱ्या येणाऱ्याची संख्या भरमसाठ असते. आज दुपारी या चौकातील ऑटो स्टँड वर अचानक काळी पिवळी जीप थांबली व ड्रायव्हर ने मागे पुढे न पाहता अचानक आपल्या बाजूचे दार उघडले, दार उघडले तोवरच दुचाकी स्वार रोहन उर्फ जॅकी माटे 24 वर्ष रा व्होल्टास सागर कॉलनी वरोरा येऊन त्या दरवाज्याला धडकला व रोडवर कोसळला तेवढ्यातच बाजूने जाणारी नागपूर सिरोंचा बस क्र . MH40 AQ 6420 या बस च्या मागच्या चाकात रोहन आला व जागेवरच त्याचा मृत्यू झाला. काळी पिवळी चा चालक गाडी सोडून पळून गेला. रोहन ला पोस्टमोर्टम करिता वरोरा उप जिल्हा रुग्णालयात नेले आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)