Top News

प्रबोधन कला मंचच्या अध्यक्षपदी आकाश कोवले, तर सचिवपदी आक्रोश खोब्रागडे.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- वासेरा  येथील बुध्द भीम गीतांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करून जाणीव जागृती करण्याचा मानस उराशी बाळगून वासेरा येथील काही हौशी तरुण एकत्र आले. आणि प्रबोधन कला मंचाची निर्मिती करून या माध्यमातून समाज जागृती करण्याचे काम सुरू केले आहे.नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये या मंचचे अध्यक्ष म्हणून इंजिनिअर आकाश सदानंद कोवले यांची निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून आक्रोश वामन खोब्रागडे यांची निवड करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून कवडूजी कोवले, गणेश कोवले, हेमंत सुर्यवंशी, महेंद्र कोवले, वसंता सुर्यवंशी,  तर कार्यवाहक म्हणून तथागत कोवले, अजित खोब्रागडे, काविष कोवले, रितेश सुर्यवंशी, प्रणय कोवले, यासह अन्य तरुणांनी सहभाग नोंदविला आहे. महापुरुषांच्या जयंतीदिनी, पुण्यतिथी दिनी, घरातील शुभकार्य प्रसंगी , बुध्द भीम गीतांच्या कार्यक्रम करून प्रबोधन केले जाणार असून जागृती जत्था सुद्धा करण्यात येत असल्याने या कार्यक्रमाचे समाजबांधवांनी आयोजन करावे. असे आवाहन अध्यक्ष आकाश कोवले, उपाध्यक्ष युवराज खोब्रागडे तर सचिव आक्रोश खोब्रागडे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने