Top News

कुलरचा विद्युत शॉक लागून महिलेचा मृत्यू.

काल आनंदाचा क्षण साजरा केल्यानंतर आज दुःखद घटना.
Bhairav Diwase.    March 27, 2021
कोरपना:- कोरपना तालुक्यातील ऊपरवाही येथे फरशी पुसत असताना कुलरचा विद्युतशॉक लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली . ही घटना आज शनिवारी (२७ मार्च) ला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान घडली. सोनु सत्यपाल पिंगे ( 22 ) असे मृत महिलेचे नाव आहे‌.

    विशेष म्हणजे काल शुक्रवारी सदर महिलेच्या मुलाचा वाढदिवसचा कार्यक्रम पार पडला होता. आनंदाच्या कार्यक्रमानंतर आज दूःखद घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. प्राप्त माहिती नुसार, ऊपरवाही येथील सोनु सत्यपाल पिंगे ( 22 ) ही आज शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घरी फरशी पुसत असताना तिचा कूलर ठेवण्याच्या स्टॅन्डला तिचा हात लागला. स्टॅन्डला करंट असल्याने तिला जबरदस्त विद्युतशॉक लागला. त्यात ती बेशुद्ध पडली. सदर घटनेची माहिती शेजाऱ्यांना होताच त्यांनी घरी येवून त्वरीत मेन स्विच बंद केला. मात्र सोनू बेशुद्ध पडली होती. काही वेळातच तिचा मृत्यू झाला. सदर महिलेच्या दोन वर्षाचा मुलाचा कालच वाढदिवस साजरा झाला होता. वाढदिवसाकरिता तिच्या माहेरुन आई वडील आले होते. सकाळी आई वडील स्वगावाला निघुन गेले. पती सत्यपाल पिंगे हे अंबुजा सिमेंट कंपनीत नोकरी गेले, त्यानंतर ही घटना घडली. गडचांदूर पोलीस स्टेशन मध्ये महिलेचा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काल आनंदाचा क्षण साजरा केल्यानंतर आज शनिवारी दुःखद घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने