Top News

तंटामुक्त समितीने लावले प्रेमीयुगलांचा विवाह.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथील तंटामुक्त समितीच्या माध्यमातून विजातीय प्रेमी युगलाचा विवाह तंटामुक्त समितीच्या उपस्थिती दिनांक २४/३/२०२१ ला इटली येथील योगेश निलकंठ डोहतरे वय २५ वर्ष या मुलाचे व पिंकी शालिकाराव गेडाम मु जप्पी ता धानोरा जिल्हा गडचिरोली येथील वय २२ वर्ष या मुलीसोबत प्रेम  असल्यामुळे मुलीने थेट मुलाचे गावी विरव्हा येथे प्रेमी  युगलाने लग्न करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी तंटामुक्त समिती अध्यक्ष रामदास जांभूळ व राजेंद्र  सावसकडे व समिती यांच्याकडे लग्न लावून देण्यास विनंती अर्ज सादर करुन वयाचे कागदपत्रे सादर केले. त्यानुसार दोघेही लग्नायोग्य असून वयाने पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांचे हिंदू धर्माच्या रितिरिवाजानुसार लग्न लावण्यात आले. यावेळी गावकयांनी नविन जोडप्याला भरभरून आशिर्वाद दिला. गावकरी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने