Top News

महिलांनी राजकारणात येणे काळाची गरज:- सतलूबाई जुमनाके

कोरपना तालुक्यातील मौजा खडकी येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला मोर्चाची शाखा स्थापण.
Bhairav Diwase.     March 26, 2021
कोरपना:- महिलांनी राजकारणात येऊन समाजाच नेतृत्व कराव, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करावे असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा परिषेदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सतलूबाई जुमनाके यांनी केले. त्या कोरपना तालुक्यातील मौजा खडकी येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या महिला मोर्चा शाखा स्थापन कार्यक्रमात बोलत होत्या. 

या वेळी मंचावर गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके, जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, कोर कमेटी अध्यक्ष पांडुरंग जाधव, अल्पसंख्यांक सेल प्रदेशाध्यक्ष अब्दुल जमीर, जेष्ठ नेते ममताजी जाधव, बाजार समिती संचालक निशिकांत सोनकांबळे, प्रदेश प्रवक्ते महेबूब शेख, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष मुनीर सय्यद, राजुरा विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष फारुख शेख, कोरपना तालुक्यातील युवा नेते संजय सोयाम, मेजर बंडूजी कुमरे, लक्ष्मण कुळसंगे, नानाजी मडावी, प्रकाश शेडमाके उपस्थित होते. 

खडकी येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या शाखा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्यात दीपाताई मडावी अध्यक्ष, सीताताई मेश्राम उपाध्यक्ष, सोनू गेडाम सचिव, सीताबाई मेश्राम, सुवर्णा मडावी, लक्ष्मीबाई परचाके, वाघूबाई कोरांगे, सुमन मेश्राम, दुर्गाबाई तुमराम, सुनीता गेडाम, गिरजा गेडाम, संजीवनी गेडाम, रंजू मेश्राम, अर्चना पेंदोर, मोतूबाई कुमरे, संगीता येडमे, नंदा आत्राम, मनीषा कुमरे, संगीता कोरांगे, शालूबाई वेरकाडे, निर्मला उरवेते, लक्ष्मीबाई गेडाम, मंजुषा मरस्कोल्हे, ज्योस्त्ना कोटनाके, अल्काबाई सिडाम, ताराबाई कोडापे, मालनबाई आडे, इंदू उरवेते, उज्वला परचाके यांची निवड करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने