'मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना'
गुलजार यांच्या ओळीचा श्रोत्यांना आला प्रत्यक्ष प्रत्यय.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- स्वरप्रिती कला अकादमी आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा (नेफडो) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सर्वधर्मसमभाव प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण मानवजातीला कोरोनाणे पुन्हा एकदा हैराण करून सोडले आहे. सर्वस्थरातून अनेक उपाययोजना, सोई, सुविधा, प्रशासनिक व्यवस्था असतानाही कोरोनाने आपली व्याप्ती वाढवलेलि आहे. संपूर्ण विश्व कोरोणामुक्त व्हावे यांकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रार्थना सभेची सुरवात इतनी शक्ती देना दाता या सुमधुर गीताने स्वरप्रितिच्या संयोजिका आणि नेफडोच्या तालुका अध्यक्षा अलका सदावर्ते यांनी केली.
गुरवंदना-अनुष्का रैच, गणेश वंदना-मीरा कुलकर्णी, हनुमान चालीसा- स्वरूपा झंवर, बुद्ध वंदना-करुणा जांभुळकर, नमाज-नशिरा शेख, शबाना शेख, पंजाबी गुरुबानी-हर्षिका हरभजन सिंग, इसाई प्रार्थना- अल्का सदावर्ते यांनी सादर केली. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे , दे वरची असा दे या राष्ट्रसंताच्या भजनाने सारे वातावरण भावविभोर झाले, सुनेणा तांबेकर, वर्षा वैद्य,भावे, विना देशकर, राजश्री उपग्नलावार , मेघा धोटे यांनी राष्ट्रवंदना सादर केली, तबला संगत नक्कावार तर हार्मोनियम वर मोहनदास मेश्राम यांनी साथ दिली. याप्रसंगी नेफडोचे जिल्हा संघटक विजय जांभुळकर , नेफडो च्या नागपूर विभाग उपाध्यक्ष नागोसे, खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , नेफडो च्या तालुका सचिव मेघा धोटे, प्रास्ताविक दिलीप सदावर्ते, तालुका उपाध्यक्ष नेफडो तर आभारप्रदर्शन, नेफडोचे नागपूर विभाग विभागीय सचिव बादल बेले यांनी केले. दोन्ही संस्थेच्या वतीने रोपटे देऊन हिंदू, मुस्लिम ,शीख,इसाई यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, रजनी शर्मा ,मनोज तेलीवार, संतोष देरकर,उमेश लढि, संदीप आदे , सुनैना तांबेकर, यांनी अथक परिश्रम घेतले. सामजीक बांधिलकी जपणाऱ्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.