चंद्रपूर:- माजरी येथील स्थानिक वॉर्ड क्रमांक ६ येथील रहिवासी कृनाल कुमरे (२५) ह्या युवकाची शुल्लक वादातून हत्या झल्याची घटना नुकतीच समोरीस आली आहे दरम्यान या घटनेतील सविस्तर वृत्त असे की कृनाल कुमरे हा दारू पिऊन घरी जात असताना वॉर्ड क्रमांक ६ येथील रहिवासी नत्थु खारकर यांच्या घरासमोरून जात असतांना शुल्लक कारणावरून वाद झाला आणि त्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले होते दरम्यान वाद झाला त्या वादमध्ये नत्थु खारकर यांचा मुलगा ज्ञानेश्वर नथु खारकर याने राग अनावर झाल्याने बैलगाडीच्या उभारीने कृनाल कुमरे याला मारहाण केली दरम्यान उभारणीच्या मारहाणीत तो नालीत पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यामध्ये काही नागरिकांनी वाद सोडवत कृनाल कुमरे याला स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु प्राथमिक उपचार करून येथील वैधकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने चंद्रपूर येथे हलविण्यास सांगितले व त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल ही करण्यात आले आणि काल दिनांक २२ला त्याचे डोक्याचे ऑपरेशन करण्यात आले परंतु डोक्यावरील घाव हे गम्भीर स्वरूपाचे असल्याने कृनाल कुमरे याचा मृत्यू रात्री ११वा. दरम्यान झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापासून दोन दिवस या घटनेची नोंद माजरी पोलीस स्टेशन ला झाली नव्हती ही महत्वाची गोष्ट! काल रात्री माजरी पोलिसांनी कार्यवाही करत नत्थु खारकर तसेच त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर नत्थु खारकर याला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही माजरी पो.नि. विनीत घागी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
युवकाची शुल्लक वादातून हत्या.
बुधवार, मार्च २४, २०२१