'ते' बांधकाम त्वरीत थांबवा,अन्यथा तीव्र आंदोलन.

Bhairav Diwase
आपचा न.प.ला इशारा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील किल्ला वार्डातील कुणबी सोसायटीमधील रहिवाशी नथ्थू संभाजी चट्टे यांच्या घरासमोर राजू डाखरे यांनी अवैधरित्या बांधकाम चालू केले असून ते त्वरीत थांबविण्यात यावे अन्यथा भद्रावती तालुका आम आदमी पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष सोनल पाटील यांनी एका निवेदनाद्वारे नगर परिषदेला दिला आहे. 
      
         दि.२६ मार्च रोजी मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांना दिलेल्या निवेदनानुसार, नथ्थू संभाजी चट्टे यांचे येथील किल्ला वार्डात कुणबी सोसायटीमध्ये स्वत:चे घर आहे. या घराच्या दरवाजासमोरच १५ फूट अंतरावर राजू डाखरे यांनी शौचालयाचे बांधकाम सुरु केले. हे बांधकाम नगर परिषदेची लेखी परवानगी न घेता सुरु केले असा आरोप करण्यात आला आहे.सदर बांधकाम त्वरीत थांबवून चट्टे यांना न्याय द्यावा अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन सादर करताना सोनल पाटील, राजकुमार चट्टे, राजू कोटा, विनीत निमसरकर, किशोर गायकवाड, सुमित हस्तक, राज राठोड उपस्थित होते. यासंदर्भात मुख्याधिकारी पिदुरकर यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी करुन कारवाई केली जाईल असे सांगितले.