विविध मागण्यांसाठी बरांज प्रकल्पग्रास्तांनी भद्रावती ते चंद्रपूर पदयात्रा.

Bhairav Diwase
0
जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- आपल्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यात यावी यासाठी येथील कर्नाटका एम्टा कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्तांनी दि.२६ ला सकाळी ९ वाजता भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वात भद्रावती ते चंद्रपूर अशी पदयात्रा काढली पदयात्रा चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालय जाऊन तेथे जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्याचे निवेदन सादर केल्यानंतर पदयात्रेची  सांगता करण्यात येईल सदर पदयात्रेला भद्रावती येथील मानोरा फाट्यापासून सुरवात करण्यात आली.
        कर्नाटक एम्टा कंपनीला दिलेल्या कोळसा उत्खननाची परवांनगी रद्द करावी, कामगाराचे २०१५ पासूनचे थकित असलेल्या वेतन द्यावे बरांज येथील गावकऱ्यांचे आधी पुनर्वसन करावे त्यांना पुणर्वसनाच पूर्ण मोबदला द्यावा व नंतरच कंपनीला कोळसा उत्खननाची परवांनगी द्यावी या प्रमुख मागण्यासह इतर मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत. कोरोना प्रादुर्भावाचा काळ लक्षात घेता गर्दी होऊन नये यासाठी प्रकल्पग्रस्तांचे केवळ विस ते पंचविस प्रतिनिधी सदर पदयात्रेत सहभागी झाले होते. सदर पदयात्रेत प्रभारी तालुका अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे, पं.स.सभापती प्रवीण ठेंगणे, सरपंच सौ. ठेंगणे, उपसरपंच रमेश भुक्या, संजय ढाकणे, विजय रणदिवे, अफझल भाई, प्रवीण सातपुते, किशोर गोवारदिपे, प्रशांत डाकरे, सुनील नामोजवार अन्य प्रकाल्पग्रस्त व भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)