Top News

नगराध्यक्षा फक्त नावपुरत्याच, न.प. चालवणारे वेगळेच."जनतेचा आरोप".

मार्च एडिंग आणि कामाचा वेग कोटीच्या घरात.
Bhairav Diwase.  March 26, 2021
कोरपना:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात १४ वित्त आयोगाचे प्राप्त अनुदानातून ओपन स्पेसचे हरितीकरण व सौंदर्यीकरण अशा ५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात येत आहे.येथील प्रभाग क्रमांक २,३, ४,५ मधील ओपन स्पेसच्या सदर कामे होणार असून यात प्रभाग क्रमांक १,६,७,८ ला वगळण्यात आल्याने या भागातील नागरिकांमध्ये नगरपरिषद विरोधात संतापाची लाट पसरली आहे.प्रभाग १ मध्ये एकुण ३ नगरसेवक अस्तित्व आहे.स्वत: नगराध्यक्षांचे हे निर्वाचन क्षेत्र असून याठिकाणी एक सत्ताधारी महिला सभापती व एक विरोधी पक्ष नगरसेवक आहे.तरीपण या प्रभागातील नागरिक विवीध समस्यांमुळे त्रस्त असल्याचे पहायला मिळत आहे.
असे असताना आता ओपण स्पेस संबंधित कामातही डावलण्यात आल्याचे लक्षात घेऊन "नगराध्यक्षा फक्त नावापुरत्याच,नगरपरिषद चालवणारे वेगळेच" असे उपहासात्मक आरोप होताना दिसत आहे.शहरात एकुण ८ प्रभाग असून सर्वच ठिकाणी एकसमान विकास कामे होणे गरजेचे आहे.मात्र ४ प्रभागातील ओपन स्पेसवर करोडोंची कामे होत आहे आणि इतर ४ प्रभाग विशेषतः प्रभाग क्रमांक १ च्या नागरिकांना निव्वळ आश्वासनांचे डोज़ पाजले जात आहे.प्रभाग क्रमांक १ ला सतत सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याचे आरोप करत वगळण्यात आलेल्या प्रभागातील नागरिकांनी नगरपरिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन देऊन मागणी केली आहे की, आमच्या प्रभागात सुद्धा सदर कामे करावी.अन्यथा आंदोलन उभारू असा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देताना प्रवीण काकडे,प्रवीण मेश्राम,प्रा.सैय्यद ज़हीर,सतीष बिडकर,सतीष भोजेकर व सुनील अरकीलवार यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने