गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या; मरणापूर्वी पत्नीला केले जखमी.

Bhairav Diwase
 
Bhairav Diwase.    March 27, 2021
कोरपना:- कोरपना तालुक्यातील वडगाव येथील शेतकरी चंद्रकांत मालेकर (55) यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 26 मार्च रोजी दुपारी घडली. 

     चंद्रकांत मालेकर यांचे शेताच्या धुऱ्याबाबत काही व्यक्तीशी भांडण झाले होते. तो घरी आला असता पत्नीशीही त्याचे भांडण झाले. त्याने पत्नीला कुऱ्हाडीने गंभीर जखमी केले व स्वतःलाही जखमी केले. शेजारी लोकांनी पत्नीला उपचारासाठी गडचांदूरला नेले. दरम्यान सदर शेतकरी आपल्या शेताकडे गेला होता. त्याचा मृतदेह आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. पाय जमिनीवर टेकलेले असल्यामुळे आत्महत्या की हत्या याबाबत गावकऱ्यात संशय व्यक्त होत आहे. गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती यांनी माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पाठवून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविला आहे. मृतकाला दोन मुले असून एक मुलगा बोरी नवेगाव येथे असतो. क्षुल्लक कारणावरून शेतकऱ्याने जीव गमावल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.