Bhairav Diwase. March 27, 2021
चंद्रपूर:- शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास शहरालगत असलेल्या पडोली पोलीस स्टेशन मागील महाराष्ट्र फर्निचर च्या दुकानाला भीषण आग लागली. आगीत लाखो रुपयांचा लाकूड व फर्निचर जळून खाक झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहचून अग्निशमन ला तात्काळ बोलावलं. चंद्रपूर महानगर पालिकेचे चार अग्निशमन घटना स्थळी पोहचून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत होते. एका तासात आगीला नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना यश मिळाले. आग कशी लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.